शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : श्री संत गजानन महाराज यांची पंढरपूरहून परतीची पालखी दि. 31 जुलै 2025 रोजी खामगावमध्ये येणार असून, यानिमित्ताने अंदाजे दोन ते अडीच लाख भाविकांचा सहभाग अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने परतीच्या प्रवासा दरम्यान भाविकांच्या सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी वाहतूक मार्गात बदलाचे आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार 31 जुलै रोजी पहाटे 3.00 वाजेपासून ते पालखीचे आगमन होईपावेतो सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत खामगांव ते शेगांव रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पर्यायी वाहतूक मार्ग
शेगाव बसस्थानकाकडून खामगावकडे जाणारी वाहतूक अण्णाभाऊ साठे चौक, राजे संभाजी महाराज चौक, मुरारका विद्यालय चौक, जय ज्योती चौक, जय क्रांती चौक, आनंद विसावा,आनंद सागर समोरुन बाळापूर रोडलं जवळा, पळसखेड, गव्हाण मार्गे खामगाव व याचप्रमाणे शेगावकडे येणारी वाहतूकीसाठी पर्याय मार्ग राहिल.
अकोट व वरवट बकाल मार्गे येणारी वाहतूक (मोठे ट्रक व कंटेनर वगळून) झाडेगाव फाटा, इंदिरा नगर, भुस्कुटी मळा जवळून, महात्मा फुले चौक, संविधान चौक, तिन पुतळे चौक, सावित्रीबाई फुले चौक, जय ज्योती चौक, जय क्रांती चौक, आनंद सागर समोरून पुढे खामगाव किंवा अकोलाकडे रवाना होईल.
अकोट व वरवट बकाल मार्गे येणारी अवजड वाहतूक (मोठे ट्रक, कंटेनर, बसेस) उड्डाण पुलावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, अग्रसेन चौक, बसस्थानक समोरुन पशु वैद्यकीय दवाखान्यासमोरुन अण्णाभाऊ साठे चौक, राजे संभाजी महाराज चौक, मुरारका विद्यालय चौक, जय ज्योती चौक, आनंद विसावा, आनंद सागर समोरून बाळापूर रोडने खामगाव किंवा अकोलाकडे रवाना होईल.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सामान्य रुग्णालय समोरुन नवीन काँक्रीट रोडने संस्थानचे पार्किंगचे मागील बाजूने चारमोरी. अग्रसेन चौक ते पशुवैद्यकीय रुग्णालय, महेश चौक, आठवडी बाजार गल्ली, भैरव चौक, इकबाल चौक, गाझीपुरा, माळीपुरा, नागझरी रोड. जगदंबा चौक, मुरारका शाळा, शिवनेरी चौक, अशफाक उल्ला चौक, जामा मशिद समोरुन माळीपुरा व नागझरी रोड राहिल. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गजानन महाराज मंदिर मार्गावरील वाहतुक दुपारी 2 ते 6.30 वाजेपर्यंत बंद राहिल.
वाहतूक नियमभंग केल्यास संबंधितावर मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 नुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेशाव्दारे कळविण्यात आले आहे.