नागपूर (युवा क्रांती वृत्तसेवा) :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडून सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने कायम क्रीडाक्षेत्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षक देण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील खेळाडूंना मोठीध्येय खुणा्वत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण, सकस आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. खेळाडूंना जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा शालेयशिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सत्कार कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

जागतिक बुद्धीबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने आपले मनोगत व्यक्त केले. राज्य शासनाचे बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती होण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले. नागपूर हे शहर माझ्यासाठी विशेष आहे. या सत्कार कार्यक्रमासाठी नागपूरकरांचे आभार मानते. या यशानंतर पुढील जागतिक स्पर्धांसाठी आणखी जोमाने तयारी करणार असल्याचे तिने सांगितले.
