---Advertisement---

शंभू फायबर आर्टमध्ये श्रावणातील महारुद्राभिषेक संपन्न

---Advertisement---

शेगाव (प्रतिनिधी) – शेगाव-बाळापूर रस्त्यावर असलेल्या अनुप पोहेकर यांच्या ‘शंभू फायबर आर्ट’ या कारखान्यातील शिवमंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसीय महारुद्राभिषेक भक्तिभावाने संपन्न झाला. यामध्ये अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण वातावरण मंत्रोच्चारांनी भक्तिमय झाले होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सलग तीन दिवस चाललेल्या या धार्मिक विधीचे संपूर्ण व्यवस्थापन कारखान्याचे मालक अनुप पोहेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. यानंतर भाविकांसाठी प्रसाद भोजनाचीही खास व्यवस्था करण्यात आली होती.

शंभू फायबर आर्टमध्ये तयार होणाऱ्या फायबर मूर्ती व शिल्पकला कलाकृती केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशातही पोहोचल्या आहेत. विविध धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक उद्याने आणि खाजगी संस्थांकडून येथे तयार होणाऱ्या कलाकृतींसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. स

ध्या या कारखान्यात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पूर्वाकृती पुतळा तयार केला जात आहे, जो चंद्रपूर येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये बसविण्यात येणार आहे. कारखाना सुरू करून धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यामागे अनुप पोहेकर यांचा स्तुत्य उद्देश आहे, जो नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment