---Advertisement---

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी मुलांना शालेय साहित्य वाटप

---Advertisement---


संग्रामपूर (आकाश बोरसे)
– शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामपूर तालुका शिवसेनेकडून शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. ग्राम निरोड येथील रहिवासी आदिवासी कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून ठाकरे गटाने आपले सामाजिक भान जपत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

या कार्यक्रमात मुलांना स्कूल बॅग, पाण्याच्या बाटल, रजिस्टर, वह्या, पेन आदी शालेय साहित्य देण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी तालुका प्रमुख रविंद्र झाडोकार, युवासेना तालुका प्रमुख प्रशांत इंगळे, तालुका संघटक तथा पळशी सरपंच राहूल मेटांगे, युवासेना विधानसभा संघटक अजय घिवे, विभाग प्रमुख धनंजय पाटील, पातुर्डा खुर्द सरपंच व शाखा प्रमुख विलास मानकर, मारोड सरपंच अजय ठाकरे पाटील, वैभव मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली राबविल्या जाणाऱ्या जनहितैषी कार्याची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करावी यासाठी शुभेच्छा दिल्या.(युवा क्रांती वृतसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment