---Advertisement---

शेगांवात तक्रार निवारण दिन राबविण्याची मागणी

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव येथील तहसील कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्यांसाठी तक्रार निवारण दिन राबविण्याची मागणी घेऊन एक निवेदन जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे शेगाव तहसीलदार यांच्यामार्फत सादर करण्यात आले. या निवेदनात शेगांव सह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात नियमितपणे तक्रार निवारण दिन आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक नागरिकांनी यासंदर्भात एकत्र येऊन या उपक्रमाची आवश्यकता व्यक्त केली.

निवेदनात म्हटले आहे की, प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद साधून, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींचे समाधान त्वरित करणे आवश्यक आहे.सर्व तहसील कार्यालयात “तक्रार निवारण दिन” प्रत्येक सोमवार आयोजित केला जावा, जेणेकरून नागरिकांना आपले लेखी निवेदन, तक्रारी, आणि मागण्या सादर करण्यासाठी एक ठिकाण मिळेल. प्रशासनाच्या पारदर्शकतेने आणि उत्तरदायित्वाने काम केले तर नागरिकांमध्ये शासनाबद्दल विश्वास निर्माण होईल आणि प्रशासनाशी त्यांच्या समस्या सोडवता येतील.तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून, तहसील कार्यालयात नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घेऊन प्रलंबित तक्रारी सोडवण्याची कारवाई केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांच्या समस्यांना तातडीने निवारण करण्यासाठी, प्रत्येक तहसील कार्यालयात तक्रार निवारण दिवस व वेळ निश्चित करण्यात यावा, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर अनंत रमेश माळी (सामाजिक कार्यकर्ता), विश्वंभर चिंचोले, गणेश टाले, पंकज लढाड, रितेश कळसकार, निखिल खटवानी, अजय जानराव बावणे, रामकुमार गुप्ता, वैभव राहणे, रमेश पाडुरंग माळी आणि इतर नागरिकांच्या सह्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment