शेगाव (प्रतिनिधी) : अध्यात्मिक वातावरणात भक्तिभावाने न्हालेलं एक दिव्य सोहळा शेगाव नगरीत पार पडणार आहे. १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२५ दरम्यान “संगीतमय श्रीमद् भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताह” चे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह गजानन आईस अँड जिनिंग फॅक्टरी, अकोट रोड, शेगाव येथे सुरू आहे.
या धार्मिक सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे संगीताच्या माध्यमातून श्रीमद् भागवत कथेचं रसग्रहण, ज्यामध्ये पावन कथावाचनासोबत भक्तिरसात चिंतन, मनन व आत्मिक समाधान मिळणार आहे. कार्यक्रमात दररोज भागवत कथा, भजन-कीर्तन व कीर्तनकारांच्या सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे. यासोबतच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सप्ताहाच्या समारोपदिनी महाप्रसाद व विशेष पूजन सोहळा ठेवण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण गजानन आईस अँड जिनिंग फॅक्टरी, अकोट रोड, शेगाव आहे. हा अध्यात्मिक सोहळा भक्तांना आत्मिक आनंद व सद्गुणांची प्रेरणा देणारा ठरणार आहे. भाविकांनी वेळेवर उपस्थित राहून, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात येत आहे.







