---Advertisement---

शहरांच्या भविष्यासाठी पुढील 50 वर्षांचा विचार करून प्रकल्प राबविण्याचे निर्देश!

---Advertisement---

मुंबई, मंत्रालय (युवा क्रांती वृतसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड (MUINFRA) अंतर्गत राज्यातील शहरी भागातील पायाभूत सुविधा व नागरी सुविधा प्रकल्पांच्या आर्थिक नियोजनासंदर्भात बैठक पार पडली.यावेळी वर्ल्ड बँक टास्क फोर्स साऊथ एशिया रिजन अर्बन डेव्हलपमेंट, रिझिलिअन्स अँड लँड प्रॅक्टिस मॅनेजर अबेदलरझाक खलील, मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरांमधील मलनिस्सारण, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सेवांसाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. या क्षेत्रांसाठी स्वतंत्र आराखडे तयार करून निव्वळ निधी पुरवठा न करता रिसोर्स प्लॅनिंगवर लक्ष केंद्रित करावे. निधीअभावी प्रकल्प थांबू नयेत, यासाठी पूरक व्यवस्था करून त्यांची अंमलबजावणी करावी. स्थानिक संस्थांना आर्थिक सहाय्य देणे आणि उभारलेल्या सुविधांचे प्रभावी मॉनिटरिंग करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरी विकास ही केवळ इमारती उभारण्याची बाब नसून सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधणारी प्रक्रिया आहे. शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकत्रित आराखडा, दीर्घकालीन नियोजन आणि निधीचा योग्य वापर या सूत्रांचा अवलंब करावा. शहरांच्या भविष्यासाठी आजच निर्णय घेऊन पुढील 50 वर्षांचा विचार करून प्रकल्प राबवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले.

यावेळी बैठकीस वर्ल्ड बँक टास्क फोर्स साऊथ एशिया रिजन अर्बन डेव्हलपमेंट, रिझिलिअन्स अँड लँड प्रॅक्टिस मॅनेजर अबेदलरझाक खलील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment