---Advertisement---

मनोज जरांगे सह लाखो समर्थकांनी केला रस्ता जाम !

---Advertisement---

मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा एल्गार! लाखोंचा लाँग मार्च मुंबईकडे – महामार्गावर ४० किमीपर्यंत ठप्प वाहतूक, राज्यात प्रचंड खळबळ

युवा क्रांती वृतसेवा (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेला लाँग मार्च अक्षरशः जनसागर ठरत असून लाखो समर्थकांसह ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या आंदोलनामुळे महामार्गावर तब्बल ४० किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली असून संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रवासी अडकून पडले, तर प्रशासन व पोलिस यंत्रणेला प्रचंड ताण सहन करावा लागत आहे.

मुंबईत आंदोलनास कुठे आणि किती वेळ परवानगी हे जाहीर होताच गावोगावी आंदोलकांचा महापूर उसळला. रस्ते, चौक, हायवे आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. “आरक्षण हक्क आमचा, लढा अखेरचा” अशा घोषणा देत आंदोलकांची लाट मुंबईकडे सरकत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत असल्याने राज्य सरकार सतर्क झाले असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र लाखोंचा जनसागर रस्त्यावर आल्याने परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment