---Advertisement---

श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी आणि ऋषीपंचमीचे विलक्षण योगायोग !

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) : शेगांवचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पसरले आहे.पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आरत्या, कीर्तन, भजनांनी वातावरण पवित्र झाले आहे. समाधी स्थळासमोर दीपप्रज्वलन, मंत्रजप आणि सामूहिक प्रार्थना करण्यात येत असून, “गण गण गणात बोते” या मंत्राच्या अखंड ध्वनीने संपूर्ण शेगाव शहर मंगलमय झाले आहे.

विशेष म्हणजे, गजानन महाराज हे 115 वर्षांपूर्वी 28 ऑगस्ट 1910 रोजी, गुरुवारच्या दिवशी शेगांव येथे समाधीस्थ झाले होते. विलक्षण योगायोग असाच की, यावर्षी त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस व तिथी दोन्ही तंतोतंत जुळले आहेत. म्हणजेच, 28 ऑगस्ट 2025, भाद्रपद शुक्लपंचमी, वार गुरुवार – हा दिवस ऋषिपंचमीच्या महोत्सवी दिवशीच गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे.

साध्या रूपात प्रकट झालेल्या या योगी पुरुषांच्या जीवनात असंख्य चमत्कारांचे उल्लेख आढळतात. सामान्य भक्तांच्या दुःखांवर उपाय दाखवताना त्यांनी दिलेला एकच मंत्र – “गण गण गणात बोते!” – आजही लाखो भक्तांना मार्गदर्शक ठरतो.या मंत्राचा अर्थ गूढ असूनही सोपा आहे. ‘गण’ म्हणजे जीव, ‘गण’ म्हणजे शिव, ‘गणात’ म्हणजे हृदयात आणि ‘बोते’ म्हणजे बघा. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे अस्तित्व पाहावे, हीच महाराजांची शिकवण. हे तत्व अंगीकारले तर कोणीही दुसऱ्याशी वाईट वर्तन करणार नाही आणि स्वतःही दुष्कृत्य करणार नाही.

भगवद्गीतेतील श्रीकृष्णाचा उपदेशही याच तत्वाशी सुसंगत आहे – “ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”. प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे, हे समजून जीव आणि शिवाची भेट साधणे, हीच खरी साधना.गजानन महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हजारो भक्त एकमुखाने आणि एकदिलाने त्यांचा मंत्र जपतात –“गण गण गणात बोते!”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment