---Advertisement---

माटरगाव बु. येथे अत्याधुनिक १००० मे.टन गोदाम बांधकामाचा लोकार्पण सोहळा व नवीन धान्य बाजाराचा शुभारंभ…

---Advertisement---

शेगाव – कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव अंतर्गत माटरगाव बुद्रुक उपबाजार येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक १००० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामाचा लोकार्पण सोहळा व नवीन धान्य बाजाराचा शुभारंभ सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांचे हस्ते उत्साहात पार पडला.

या लोकार्पण सोहळ्यास अध्यक्षस्थानी माटरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अनंतराव आळशी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माऊली ग्रुपचे चेअरमन ज्ञानेश्वरदादा पाटील, दिनेश एम.डागा, उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय, अमरावती, एम.जी. काकडे, जिल्हा पणन अधिकारी बुलढाणा, जिल्हा परिषद माजी सभापती सुरेश वनारे, भीमरावजी राऊत, शेगांव खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ भांबेरे, जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ देवचे, माटरगाव चे सरपंच इनायतभाई, ग्रामसेवा सोसायटी माटरगावचे अध्यक्ष राजेश बाजारे, पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल सोनटक्के, शेतकरी नेते कैलास फाटे, बाजार समितीचे माजी सभापती गजाननराव भटकर, उपसभापती सुनील वानखडे, देवलाल पाटील लांजुळकर, माजी पोलीस पाटील दिलीप देशमुख, गजाननराव देशमुख, निवृत्तीभाऊ खवले, निंबाळकर साहेब, गजानन निखाडे, महादेवराव देठे, दिंडोकार साहेब यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे उपसभापती श्रीकांत तायडे संचालक विठ्ठल पाटील,श्रीधर पाटील, रमेश पाटील, दादाराव निळे, योगेश थारकर, परमेश्वर हिंगणे, अमोल लांजुळकर, संजय गव्हांदे, गुलाब खा, रितेश टेकडीवाल, श्रीधर पुंडकर, वासुदेवराव धुमाळे, तेजराव दळी, अरुण पाटील खोंड, संजय शेळके, संतोष भारसाकडे, शेगांव खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष अनंतराव बोरसे, संचालक नारायण नावकार, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

शेतकरी बांधवांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे अनेकांनी कौतुक केले. धान्य बाजाराच्या शुभारंभामुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी सुलभता मिळणार असून, गोदामाच्या माध्यमातून त्यांच्या कृषी उत्पादनाची सुरक्षित साठवणुकीची सोय निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल सदर धान्य बाजारात विक्रीला आणावा असे आवाहन यावेळी सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांनी केले. पणन मंडळाच्या योजना, व बाजार समिती करीत असलेले उत्कृष्ट कामकाज यावर भर देऊन पणन मंडळामार्फत व बाजार समिती मार्फत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक गोदामाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिनेश एम डागा उपसरव्यवस्थापक कृषी पणन मंडळ अमरावती यांनी केले. तर ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी आपले भाषणामधून शेतमाल तारण योजना, शासनाचे किमान आधारभूत योजनेअंतर्गत उपबाजार येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री करणे बाबत उपस्थित शेतकरी बांधवांना आवाहन करून शेतकरी हितासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले.

कृषी पणन मंडळ पुणे व बाजार समिती शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेले हे अत्याधुनिक गोदाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल, तसेच बाजार समितीच्या व्यवहारात पारदर्शकता व गती येणार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतराव आळशी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी पांडुरंगदादा पाटील यांना लोकमत गौरव पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन माटरगाव ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत करण्यात आला. तसेच शेगाव तालुका खरेदी विक्री संघाला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्रीधरदादा पाटील यांचे सह उपस्थित संचालक मंडळाचा सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच नव्याने सुरू झालेल्या धान्य बाजारात आपला शेतीमाल विक्रीला आणणारे शेतकरी बांधवांचा सत्कार सुद्धा शेला, हार,टोपी व नारळ देऊन बाजार समितीच्या वतीने करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी केले तर सूत्रसंचालन मनिष देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन समितीचे सभापती गोपाळराव मिरगे यांनी केले. या कार्यक्रमास बाजार समितीचे कर्मचारी, व्यापारी, परिसरातील ग्रामसेवा सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, व शेतकरी बांधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment