पळशी झाशी (आकाश बोरसे) : येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रियांका राहुल मेटांगे यांच्या संकल्पनेतून व तामगाव पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात पोलीस उपनिरीक्षक रामकिशन माळी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वाढता वापर, अभ्यासाचे महत्त्व व चांगले शिक्षण घेऊन गावाचे नाव उज्ज्वल करण्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच शंकरगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गावातील अनेक विद्यार्थी नोकरीस लागले असून पुढील पिढीनेही त्याचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत व शाळेतील विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संपर्क साधण्यासाठी पोलीस पाटील संतोषभाऊ निकाळजे यांच्या पाटीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच पती राहुल मेटांगे, पोलीस पाटील संतोष निकाळजे, सुजित बांगर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती पदाधिकारी, शिक्षकवृंद, गावकरी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.