---Advertisement---

भाजपच्या वैऱ्याशी शिवसेनेची हातमिळवणी, थेट पत्रकार परिषदेत युतीची घोषणा

---Advertisement---

ठाणे (युवा क्रांती वृतसेवा) : शिवसेना आणि टीम ओमी कलानी (टीओके) यांनी भाजपला धक्का देत उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हातमिळवणी केली. संयुक्त पत्रकार परिषदेत शनिवारी रात्री युतीची घोषणा करण्यात आली.

उल्हासनगर शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कलानी कुटुंबाचे महत्त्व प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर वाढत असते. त्यात अनेक वर्षे तुरुंगात असलेले सुरेश ऊर्फ पप्पू कलानी सध्या तुरुंगाबाहेर असल्याने राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत.

महापालिका आणि विधानसभेत एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या राजकारणात भाजप आणि कलानी यांच्यातील वैर वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत ‘टीओके’ने शिवसेना आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत केली होती. त्यानंतर शिंदे आणि कलानी यांच्यातील जवळीक वाढल्याने शहरात ‘दोस्ती का गठबंधन’चे बॅनर झळकत होते.

नुकत्याच एका धार्मिक कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या खा. शिंदे यांनी ओमी कलानी यांच्यासमोत एकाच वाहनातून प्रवास केला होता. त्यानंतर कलानी यांनी स्थानिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने कलानींचे काही निष्ठावंत गळाला लावत त्यांचा पक्षप्रवेश करून कलानींना धक्का दिला होता.

या दरम्यान अचानक कलानी यांच्या बंगल्यावर शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कलानी यांनी शिवसेना-‘टीओके’ युतीची घोषणा केली. त्यामुळे शिवसेना ‘टीओके’सोबत एकत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या युतीबाबत भाजपकडून काय रणनीती आखली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment