---Advertisement---

कोमकर हत्या प्रकरणात मोठी माहिती; आंदेकर टोळीची नजर सोम्या गँगवर !

---Advertisement---

 पुणे (युवा क्रांती वृतसेवा) : गोळीबार करून आयुष कोमकरचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अदिकर टोळीच्या सदस्यांच्या रडारवर प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड सदस्यही असल्याचे टोळीतील उघडकीस आले असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत; तसेच आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती गोळा केली जात असून, कृष्णा आंदेकरसह अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, विशेष ‘मकोका’ न्यायालयाने अटक आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांच्या पोलिस कोठडीत २२ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.

वनराज माजी नगरसेवक आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुषचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह १३ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. भवानी पेठ) हिने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात आयुषवर गोळ्या झाडल्याचा आरोप असलेला यश सिद्धेश्वर पाटील (वय १९) आणि घटनास्थळी हजर असलेल्या अमित प्रकाश पाटोळे (वय १९, दोघे रा. नाना पेठ) यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (१२ सप्टेंबर) संपली. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात दोघा आरोपींना हजर करण्यात आले. तपास अधिकारी निरीक्षक चेतन मोरे आणि विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी तपासातील प्रगती न्यायालयात सादर केली.

अॅड. मिथुन चव्हाण, अॅड. प्रशांत पवार व अॅड. मनोज माने यांनी आरोपींची बाजू मांडली. ‘आरोपींना पुरेशी पोलिस कोठडी दिली असून, त्यांनी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात यावी,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत दहा दिवसांची वाढ केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment