---Advertisement---

स्वच्छ गांव सुंदर गांव मोहिमेत गांवकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

---Advertisement---

पळशी झाशी (आकाश बोरसे) : ग्रामपंचायत पळशी झाशी तर्फे स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेअंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 या उपक्रमात गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शासनाच्या एक दिवस – एक तास – एक सोबत या उपक्रमा अंतर्गत 25 सप्टेंबर रोजी गावकऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली.

या उपक्रमास सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, सचिव हेमंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा वर्कर, बचत गट महिला, शाळा समिती सदस्य, गावकरी व शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत पळशी झाशी ही सुरुवातीपासूनच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून, शासनाने जाहीर केलेल्या सेवा पंधरवड्या अंतर्गत दररोज ठरवून दिलेल्या रुपरेषेनुसार आपली कामगिरी सातत्याने पार पाडत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment