---Advertisement---

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना !

---Advertisement---

राज्यपालांमार्फत बुलढाणा जिल्ह्यातून 3 नियुक्ती

बुलढाणा (युवा क्रांती वृतसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महामहीम राज्यपाल यांच्या वतीने भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या समस्यांचा अभ्यास व पाहणी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत बुलढाणा जिल्ह्यातील अग्रगण्य कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

या समितीमध्ये दामोदर परकाळे (विदर्भ प्रांत चमू सदस्य, भटके विमुक्त विकास परिषद), समाधान गुराळकर (जिल्हा समिती सदस्य व भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंट विदर्भ अध्यक्ष तसेच भटका जोशी समाज संघटना महाराष्ट्र अध्यक्ष) आणि भानुदास पवार (जिल्हा समिती सदस्य व भटके विमुक्त कार्यकर्ते, अभ्यासक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीचे प्रमुख कार्य म्हणजे, भटक्या-विमुक्त समाजातील अडीअडचणींचे निराकरण करणे, जातीचे दाखले, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे, बेघर कुटुंबांची यादी तयार करणे, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर काम करणे.

भटक्या-विमुक्त समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या समितीत स्थान मिळाल्याने समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे सामाजिक न्याय व समता प्रक्रियेला चालना मिळेल, असे मत विविध स्तरांतून नोंदवले जात आहे.

दरम्यान, समितीत नियुक्त झालेल्या कार्यकर्त्यांचे सर्व भटके विमुक्त संघटना तसेच सामाजिक व राजकीय स्तरांवरून सत्कार, गौरव व अभिनंदन होत असून, या समितीच्या कामकाजामुळे भटक्या विमुक्त समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment