अमरावती (युवा क्रांती वृत्तसेवा): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे जिल्हा निवडणूक कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक डॉ. आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत पार पडली. आगामी निवडणुकांसाठीची संघटनात्मक रणनीती, बूथस्तरावरील तयारी, तसेच कार्यकर्त्यांमधील समन्वय अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

बैठकीत मतदारांपर्यंत आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा सकारात्मक संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी योग्य मार्गदर्शनही करण्यात आले. निवडणुकीच्या दृष्टीने जनसंपर्क वाढविणे, संघटना एकदिलाने काम करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ठोस जबाबदाऱ्या देण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, आमदार उमेश यावलकर, राजेश वानखडे, प्रवीण पाटील तायडे, प्रताप अडसड, केवलराम काळे, माजी मंत्री प्रवीण पोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, रविराज देशमुख, तसेच जिल्हा सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष आणि अन्य प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी निवडणूक लक्षात घेता ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून पक्षाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.











