---Advertisement---

प्रभाग 7(ब) मध्ये तिहेरी लढत; मतदारांची उत्सुकता शिगेला!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी शेगांव नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 (ब) मध्ये तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. या प्रभागातून भाजपच्या निकिता चव्हाण, काँग्रेसच्या शेख सना शेख राजिक आणि शिवसेना (उबठा)च्या रूपाली शिंदे या तीनही उमेदवारांची जोरदार तयारी सुरू असून मतदारांच्या मनावर कोणाची छाप पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून निकिता चव्हाण या उमेदवार मैदानात असून संघटनाच्या बळावर त्यांनी प्रचार मोहीम गतीमान केली आहे. काँग्रेसच्या शेख सना शेख राजिक या प्रभागातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतदारांशी संवाद साधत असून महिला मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे शिवसेना (उबठा)च्या रूपाली शिंदे स्थानिक पातळीवरील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि दैनंदिन समस्या यावर विशेष भर देत जनसंपर्क वाढवत आहेत.

प्रभाग 7 (ब) मधील लढत तिरंगी असली तरी कोणत्या उमेदवाराच्या रणनीतीला मतदार पसंती देतात याबाबत उत्सुकता कायम आहे. तिन्ही पक्षांनी प्रचारात जोर लावल्यानंतरही अंतिम क्षणी मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या तिन्ही उमेदवारांपैकी कोण मारणार बाजी? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment