---Advertisement---

शेगांव–जलंब दरम्यान अनोळखी महिलेची रेल्वेखाली आत्महत्या!

---Advertisement---

शेगांव (डी ललित) : शेगांव आणि जलंब रेल्वे स्थानकांच्या दरम्यान भीषण घटना घडली असून अंदाजे ३० ते ३५ वयाच्या अनोळखी महिलेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२५ गुरुवारी दुपारी सुमारे १३.२० वाजण्याच्या सुमारास घडली.

उप स्टेशन प्रबंधक शेगांव म. रे. आर. एस. देशपांडे यांच्या सहिचा मेमो पाइटसमन श्रीकांत वानखडे यांनी पोलीसांकडे सादर केला. या मेमोमध्ये नमूद केल्याप्रमाणे, शेगांव –जलंब स्थानकांदरम्यान कि.मी. 543/27 येथे सं. 22723 क्रमांकाच्या रेल्वेसमोर उडी घेतल्याची माहिती लोको पायलट एस. राम (मुख्यालय भुसावळ) यांनी फोनद्वारे दिली होती. घटनास्थळी महिलेचा मृतदेह अचेत अवस्थेत पडलेला आढळला.

सदरील मेमो प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ नोंद घेत तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के (पो. स्टे. शेगांव शहर) यांच्याकडे सुपूर्द केली.

घटनेचा पुढील तपास नापोका निलेश गाडगे ( पो. स्टे. शेगांव शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांकडून तपास वेगाने चालू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment