---Advertisement---

संशयास्पद हालचालीत आढळून आलेल्या तरुणावर पोलिसांची कारवाई

---Advertisement---

शेगाव (डि ललित): शेगाव शहर पोलिसांनी संशयास्पद परिस्थितीत लपून बसलेल्या एका तरुणावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणी कायमी अप. क्र. 678/2025 नुसार कलम 122 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 29 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.00 ते 11.50 वाजेदरम्यान शेगाव शहरातील श्री टॉकीज चौकाजवळ नमूद आरोपी अंधाराचा फायदा घेऊन आपले अस्तित्व लपवत दुकानाच्या आडोशाला संशयास्पदरीत्या लपून बसलेला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पंचासमक्ष कारवाई दरम्यान आरोपी मोहमंद साकीब मोहमंद फारुख (वय 24, रा. इदगाह प्लॉट, शेगाव, जि. बुलढाणा) यास ताब्यात घेण्यात आले.

आरोपी हा एखादा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी पो. हे. कॉ. गणेश जगदेव वाकेकर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हा दि. 30 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 12.28 वाजता दाखल करण्यात आला असून, दाखल अधिकारी पो. हे. कॉ. विनायक सरोदे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पो. हे. कॉ. गजानन वाघमारे हे करत आहेत.

शेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतत गस्त व दक्षता ठेवण्यात येत असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(युवा क्रांती शेगांव)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment