---Advertisement---

पळशी झाशीच्या सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

“अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार स्वीकारताना सौ. प्रियंका राहुल मेटांगे”
---Advertisement---

पळशी झाशी (आकाश बोरसे) : सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान सोहळा 2025 मध्ये ग्रामपंचायत पळशी झाशी येथील सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले. हा भव्य पुरस्कार सोहळा अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली उल्लेखनीय कामगिरी, सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून राबवलेल्या विविध शासकीय योजना तसेच विकास कामांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

हा मानाचा पुरस्कार
श्री महंत डॉ. श्रीकांत धुमाळ (उज्जैन),
मा. डॉ. शंकर अंदानी,
सिने अभिनेत्री मा. रुचिता देसाई,
भाऊसाहेब पावसे व
मा. बाबासाहेब पावसे

यांच्या शुभहस्ते सौ. प्रियंका मेटांगे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विकास कामांचा गौरवशाली प्रवास

सरपंच सौ. प्रियंका मेटांगे यांनी ग्रामपंचायत पळशी झाशी येथे केलेल्या विकास कामांमुळे यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये —

  • नाशिक येथे गुरुमाऊली व न्यायमंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते आदर्श महिला पुरस्कार
  • बुलढाणा येथे जिल्हास्तरीय लोकमत सरपंच अवॉर्ड
  • लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषद राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कार
  • संभाजीनगर येथे पहाट फाउंडेशन आदर्श महिला सरपंच पुरस्कार
  • पंचायत समिती व विविध सामाजिक संस्थांमार्फत सुमारे ५०–६० ठिकाणी सत्कार

याशिवाय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीने पुढाकार घेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून गावाचा विकास सातत्याने सुरू आहे.

पुरस्कारानंतर प्रतिक्रिया

पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांनी आयोजकांचे आभार मानले.
त्यांनी सांगितले की,

“हा पुरस्कार माझा एकटीचा नसून, सचिव मा. श्री हेमंत बापू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गटातील महिला आणि गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच मिळाला आहे. या यशात गावकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.”

(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment