---Advertisement---

संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल एकलारा बानोदा येथे आनंद मेळावा उत्साहात साजरा

आनंद मेळावा
---Advertisement---

एकलारा बानोदा (आकाश बोरसे) : संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल, एकलारा बानोदा येथे आनंद मेळावा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती

या आनंद मेळाव्याचे अध्यक्षस्थान शाळेचे प्राचार्य शिवकुमार सुरेशराव भातखडे यांनी भूषविले.
कार्यक्रमाला खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली—

  • सौ. भारतीताई अस्वार – सरपंच
  • गणेश हागे – पोलीस पाटील
  • श्रीकृष्ण लापुरकर
  • महेश कुचेकर
  • कठाने सर
  • सेवानिवृत्त डॉ. अशोकराव भुते सर
  • सौ. मायाताई भुते

संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी—

  • अमोल भातखडे – उपाध्यक्ष
  • सौ. राधा शिवकुमार भातखडे – मुख्याध्यापिका
  • सौ. दिपाली ताडे – प्राचार्या

तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment