---Advertisement---

ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी श्याम देशमुख यांची फेरनिवड

जिल्हाध्यक्ष श्याम देशमुख
---Advertisement---

चिखली (युवा क्रांती वृत्तसेवा) : तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ पत्रकार श्याम देशमुख यांची ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल (AJFC) या भारतातील पहिल्या केंद्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. ही निवड संघटनेच्या केंद्रीय व राज्य समितीच्या मान्यतेने करण्यात आली आहे.

याआधी श्याम देशमुख यांनी ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी व संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत AJFC चे संस्थापक अध्यक्ष यासीन भाई पटेल यांनी त्यांची सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली.

नियुक्तीपत्रावर केंद्रीय सचिव अतुल होनकळसेविश्वस्त गणेश कोळी यांच्या स्वाक्षऱ्या असून, पुढील कार्यकाळात संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने प्रभावी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नियुक्तीपत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, संघटनेच्या ध्येय-धोरणांच्या अधीन राहून राज्यपातळीवर संघटना मजबूत करणे, तसेच सभा, संमेलन व कार्यशाळांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करावेत. या सर्व कार्यासाठी केंद्रीय समितीकडून आवश्यक ते मार्गदर्शन दिले जाईल.

विशेष म्हणजे, दैनिक देशोन्नती वृत्तपत्रात 1997 पासून श्याम देशमुख हे अत्यंत प्रामाणिक व निष्कलंक पत्रकारिता करीत असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. या फेरनिवडीमुळे पत्रकार बांधवांसह विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment