---Advertisement---

अमरावती मनपा महापौरपदी श्रीचंद तेजवानी, उपमहापौरपदी सचिन भेंडे

amrawati mahanagarpalika
---Advertisement---

अमरावती (युवा क्रांती वृत्तसेवा) : अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौरपदी युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे यांची बहुमताने निवड झाली आहे. या यशस्वी निवडीबद्दल अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रभारी, जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले की,
“अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासन उभारण्यासाठी आपले नेतृत्व निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

तसेच त्यांनी पुढे नमूद केले की,
“अमरावतीच्या प्रगतीचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. शहराच्या विकासासाठी आपण घेतलेले निर्णय नागरिकांसाठी हितकारक ठरतील, यासाठी आपणास पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा!”

महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या या निवडीमुळे अमरावतीच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment