---Advertisement---

आकाशवाणी केंद्राचे अधिकारी श्री. संतोष शेगोकार यांचा सेवापूर्ती गौरव समारोह संपन्न!

---Advertisement---


शेगाव (युवा क्रांती वृतसेवा ):- दि. 2 ऑगस्ट 2025 शेगांव येथील निवासी ,बुलढाणा जिल्हा संत निरंकारी मिशनचे संयोजक आणि ब्रम्हज्ञान प्रचारक तसेच अकोला आकाशवाणी केंद्राचे मान्यवर अधिकारी ,श्री. संतोष चंद्रभान शेगोकार साहेब (माटरगांवकर)यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा काल शेगांव येथे वर्धमान जैन मंगल भवन मध्ये सोत्साह संपन्न झाला .आकाशवाणी केंद्रात 36 वर्ष सेवा देत असतांनाच, पारमार्थिक विचार प्रबोधनाचे कार्य सुद्धा त्यांचे अविरत सुरू आहे त्यांचे कार्य प्रेरणादायी आणि स्तुत्य असेच आहे.कारण ब्रम्हज्ञान नव्हे लेकुरा च्या गोष्टी सद्गुरू क्रुपा झाली आणि इमारत फळा आली अशी शेगोकार साहेबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये मान्यवरांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संत साहित्य अभ्यासक,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, डॉ.ज्ञानेश्वर मिरगे सर म्हणाले,इवुलेसे रोप लाविले अंगणी तयाचा वेलु गेला गगनावरी, सद्गुरू क्रुपेने आत्म स्वरूपाची अनुभूती घेऊन,त्या अनुभूतीतील सार सद्गुरूंच्याच क्रुपेने सर्वसामान्य जिज्ञासू साधकापर्यंत दीपस्तंभा प्रमाणे प्रबोधित करण्याचे आदर्श कार्य साहेबांनी केले आहे.करित आहेत व आता यापुढेही करित राहतील.सद्गुरु हे भूतकाळातील दुवा आणि भविष्य काळातील दिवा असतात आणि भक्तांचा वर्तमान सजवितात,हा विचार शेगोकार साहेबांनी निष्पृहतेने वर्धिष्णु केला. हे कार्य स्तुत्य असेच आहे. साहेबांच्या सेवाभावी आणि मानवतावादी प्रशासकीय कार्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी त्यांना गुरुस्थानी असलेल्या आई श्रीमती शांताबाई शेगोकार , हभप डॉ. ज्ञानेश्वर मिरगे सर (ज्यांच्या मुळे बालपणी आध्यात्मिक बाळकडू मिळाले),सोनटक्के गुरुजी,जलंब (तात्कालिन प्राथमिक शिक्षक) वर्गमित्र सुरेश भाऊ जळमकार , ग्राम मित्र आसिफ भाई,मंजुर भाई, कष्टकरी नागोराव फुटवाईक यांचा सत्कार शेगोकार दाम्पत्यांनी केला. निरंकारी मिशन परिवार, आणि ग्राम स्नेहा प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सुशील दाम्पत्य संतोष शेगोकार, सौ शकुंतला शेगोकार यांचा, उपस्थित असलेल्या मान्यवरांनी हार्दिक सत्कार केला.भूदेव गोरे साहेब, खामगांव, दिनकर पाटील मुंबई, ज्ञानेश उंबरकर, कल्याण, सुरेश शेवाळे, खारघर, शालिग्राम चवरे, जिल्हा संयोजक व ज्ञान प्रचारक चिखली यांनी याप्रसंगी विचार व्यक्त केले. गुरुस्थानी असलेल्या आई श्रीमती शांताबाई शेगोकार, जीवनाला सद्आकार देणाऱे रामदास सोनटक्के, गुरुजी भूदेव गोरे साहेब आणि ग्राम स्नेही, सद्गुरू माता सुदिक्षा जी महाराज आणि संत निरंकारी परिवार यांचे प्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी त्यांचे महाराष्ट्रातील आध्यात्मिक सहकारी, आकाशवाणीचे केंद्रातील स्नेही, निमंत्रित अतिथी सह, परिवारातील सर्वांसह, नातेवाईकांची भरगच्च उपस्थिती होती. ऋणनिर्देशन करताना,व सत्काराला उत्तर देताना…. सद्गुरू च्या मुखे होई ब्रम्हज्ञान तेव्हा कळे खुण विठोबा ची भावी उर्वरित आयुष्यात सुद्धा मला सद्गुरूचा असाच आशीर्वाद व संतांचा सहवास मिळत रहावा. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..(मज लगे मुक्ती)धन संपदा संत संग देगा सदा.अशा प्रकारची अपेक्षा ठेवून उर्वरित आयुष्यात पुर्णपणे सत्याचा प्रचार व मानव को मानव हो प्यारा इक दुजे का बने सहारा या सुविचारा प्रमाणे या सेवा कार्यामध्ये जीवन व्यतीत व्हावे.अशी प्रार्थना संतोष शेगोकार यांनी सद्गुरू चरणीं व्यक्त केली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन अकोला आकाशवाणीचे उदघोषक विकास पल्हाडे, सुभाष राजपूत, बुलडाणा यांनी अतिशय रोचक केले . नियोजनबद्ध असा ,प्रेरणादायी सेवा निवृत्ती गौरव सोहळा सर्वांना आनंददायी वाटला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment