---Advertisement---

स्व. शिवाजी कर्डिले यांच्या आठवणींना मुख्यमंत्री फडणवीस यांची आदरांजली !

---Advertisement---

अहिल्यानगर (युवा क्रांती वृत्तसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर जिल्हा अहिल्यानगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्व. कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे सहकार, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची सखोल जाण असलेले नेतृत्व होते. त्यांचा ग्रामीण भागाशी अतूट संबंध होता. त्यांच्या निधनाने एक सर्वगुणसंपन्न, लोकहितैषी नेतृत्व हरपले असून, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”

या शोकसभा प्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार राहुल कुल, पद्मश्री पोपट पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment