---Advertisement---

आरोग्यमंत्र्यांची मलकापूर तालुक्यातील दसरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट…

---Advertisement---

मलकापूर (युवा क्रांती वृतसेवा) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी शेगांव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मलकापूर तालुक्यातील दसरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी नव्याने उभारलेल्या इमारतीची पाहणी केली आणि केंद्रातील चालू कामकाजाचा सविस्तर आढावा घेत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

आरोग्य केंद्रातील उपलब्ध सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आणि सेवांचा अधिक प्रभावीपणे विस्तार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सध्या सुरू असलेल्या कामांविषयी माहिती दिली असता, मंत्री महोदयांनी त्यांचे कौतुक केले आणि जनतेस उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या भेटीदरम्यान आरोग्य सेवा उपसंचालक वाघचौरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी मलकापूर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. उपसंचालक वाघचौरे यांनी प्रत्यक्ष केंद्राला भेट देऊन कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले आणि समाधान व्यक्त केले.

यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेत स्वतःच्या हस्ते वृक्षारोपण केले. आरोग्य सेवा आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा संदेश त्यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment