---Advertisement---

शेगांव–नागझरी दरम्यान अज्ञात व्यक्तीची रेल्वेखाली आत्महत्या!

---Advertisement---

शेगांव (डी ललित) : उप स्टेशन प्रबंधक, शेगांव (म. रे.) सुरेश एस. गोळे यांच्या सहीचा मेमो पोलिसांकडे सादर करण्यात आला. या मेमोमध्ये नमूद केल्याप्रमाणे, शेगांव ते नागझरी स्थानकादरम्यान कि.मी. 547/33 येथे एका अज्ञात व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी दुपारी उघडकीस आली. गाडी क्र. 01211 चे लोको पायलट यू. ई. गोडबोले यांनी वॉकी-टॉकीद्वारे स्टेशन प्रबंधकांना हा संदेश दिला. गार्ड व्ही. के. सिंह यांनीही घटनेची माहिती नोंदविली आहे.

लोको पायलटांनी दिलेल्या विशेष कथनानुसार, गाडी पुढे जात असताना एक व्यक्ती अचानक रेल्वे रुळांवर झोपला. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. संबंधित मेमो तात्काळ पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आला. घटना स्थळी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

शेगांव पोलीस स्टेशनमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळवावी. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment