AI निर्मित फोटोची करामत! गुणरत्न सदावर्तेंचे बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल! मजा की माणसाची फसवणूक?
युवा क्रांती वृत्तसेवा (सचिन कडूकार) : गुणरत्न सदावर्ते यांचे काही बनावट, AI-निर्मित फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. हे फोटो इतके वास्तवदर्शी आहेत की, सामान्य वापरकर्ते ते खरे मानून शेअर करत आहेत – त्यामुळेच सदावर्तेंच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
या फोटोंचा वापर करून काही मंडळी सोशल मीडियावर विनोद, मीम्स आणि ट्रोलिंग करत आहेत. काहींसाठी हा हसण्याचा विषय असला, तरी इतरांना हा संगठित बदनामीचा प्रयत्न वाटतो.
विशेष म्हणजे, हे फोटो कुठल्याही वास्तवाशी संबंध नसतानाही, लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत, चर्चा करत आहेत, आणि अनेकदा तथ्य तपासल्याशिवाय पुढे शेअर करत आहेत.
AI च्या नावाखाली सुरू असलेला हा “खोटं खरं ठरण्याचा” खेळ समाजात संभ्रम पसरवतो आहे का? की हे केवळ मनोरंजन म्हणूनच घ्यावं? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर ऐरणीवर आला आहे.








