---Advertisement---

अजित पवारांचे पुण्यात वाहतूक नियोजन तपासणी दौरा !

---Advertisement---

पुणे (युवा क्रांती वृतसेवा) : पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. केशवनगर – मुंढवा भागात नव्याने तयार होत असलेल्या पुलाची त्यांनी पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सदर पुलाचे उर्वरित काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. पुल कार्यान्वित झाल्यानंतर या भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित होणार आहे.

यानंतर अजित पवार यांनी मुंढवा येथील मुंढवा – केशवनगर चौकात होणाऱ्या वारंवार वाहतूक कोंडीच्या समस्येचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची नोंद करून त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे हडपसर येथील गाडीतळ चौकात सुनियोजित वाहतुकीसंदर्भातही पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना योग्य उपाय राबवण्याचे आदेश दिले.

अजित पवार यांनी नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने आवश्यक उपाय करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे यावर भर दिला. त्यांच्या या पाहणीमुळे पुणे शहरातील वाहतूक समस्या लवकर सुटण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment