---Advertisement---

नायलॉन मांज्याचा जीवघेणा धोका; अकोट रोडवर पिता–पुत्र बचावले!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा ) : शहरातील अकोट रोडवरील पुलाजवळ आज सकाळी एक गंभीर दुर्घटना टळली. टू-व्हिलरवरून जात असलेल्या पिता–पुत्राच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजा अडकला. काही क्षणांसाठी दोघांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता.

प्राप्त माहितीनुसार, वडील मोटारसायकलवरून आपल्या लहान मुलाला घेऊन पुलावरून जात होते. त्या दरम्यान उडत आलेला नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. परिस्थितीची जाणीव होताच वडिलांनी तत्काळ शांतता राखत गाडी बाजूला उभी केली व रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकाला मदतीसाठी हाक दिली. तेथील नागरिकाच्या तत्परतेने मांजा गळ्यातून काढण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला.

नायलॉन मांज्यामुळे अशाप्रकारच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जीविताला मोठा धोका निर्माण होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांमध्ये नायलॉन मांजा न वापरण्याबाबत जागरुकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनानेही कठोर कारवाई करून या जीवघेण्या मांज्यांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment