एकलारा बानोदा (आकाश बोरसे) : संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल, एकलारा बानोदा येथे आनंद मेळावा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती
या आनंद मेळाव्याचे अध्यक्षस्थान शाळेचे प्राचार्य शिवकुमार सुरेशराव भातखडे यांनी भूषविले.
कार्यक्रमाला खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली—
- सौ. भारतीताई अस्वार – सरपंच
- गणेश हागे – पोलीस पाटील
- श्रीकृष्ण लापुरकर
- महेश कुचेकर
- कठाने सर
- सेवानिवृत्त डॉ. अशोकराव भुते सर
- सौ. मायाताई भुते
संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी—
- अमोल भातखडे – उपाध्यक्ष
- सौ. राधा शिवकुमार भातखडे – मुख्याध्यापिका
- सौ. दिपाली ताडे – प्राचार्या
तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (युवा क्रांती वृत्तसेवा)









