---Advertisement---

शेगांव नगरपरिषद निवडणूक २०२५; अर्ज छाननीनंतर बहुसंख्य उमेदवार पात्र!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगांव नगरपरिषदेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया 18 नोव्हेंबर रोजी सकाळी अंदाजे 11 वाजता पार पडली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही छाननी काटेकोर पद्धतीने करण्यात आली.

नगराध्यक्ष तसेच विविध प्रभागांमधील नगरसेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीदरम्यान प्रत्येक उमेदवाराने सादर केलेली आवश्यक कागदपत्रे, शपथपत्रे आणि माहितीची पूर्तता यांची तपशीलवार तपासणी करण्यात आली.

या प्रक्रियेत बहुसंख्य उमेदवारांचे अर्ज नियमांनुसार योग्य ठरले असल्याचे समजते. तर काही अर्जांत आवश्यक कागदपत्रांचा अभाव, माहितीतील अपूर्णता किंवा तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे ते अर्ज अमान्य ठरविण्यात आले आहेत.

अर्ज छाननीनंतर निवडणुकीची पुढील घडामोडी गतीमान होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment