---Advertisement---

आठवडी बाजारात अवैध दारूची विक्री उघड; एकाला अटक!

---Advertisement---

शेगांव (डी. ललित) : शहरातील आठवडी बाजार परिसरात अवैध देशी दारूची विक्री करण्यासाठी ठेवलेल्या साठ्यावर पोलिसांनी छापा टाकत एकाला ताब्यात घेतले. सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ५.४० ते ६.१० वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

शेख अब्बास केला सेंटरच्या बाजूलाच संशयाच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. छाप्यामध्ये आरोपीच्या ताब्यातून टॅगो पंच कंपनीच्या ९० एमएल क्षमतेच्या देशी दारूच्या २० बाटल्या मिळून आल्या. या मुद्देमालाची किंमत एकूण ८०० रुपये इतकी आहे. तसेच एक वायरची थैलीही जप्त करण्यात आली.

आरोपीची ओळख विनोद महादेव उपाध्ये (वय ३५, रा. वरखेड खुर्द, ता. शेगाव) अशी झाली आहे. पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या रेडमध्ये आरोपी अवैध दारूसह सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

घटनेची नोंद त्याच दिवशी रात्री १०.१४ वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. दाखल प्रक्रिया पोहेकॉ रामदास घटटे यांनी पूर्ण केली असून पुढील तपासाची जबाबदारी पोहेकॉ श्याम आघाव यांच्याकडे देण्यात आली आहे.

शहरात अवैध दारू विक्रीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment