---Advertisement---

भास्कर डोसे सरांना ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2024-25’ जाहीर !

---Advertisement---

संग्रामपूर (सचिन कडूकार): जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने सन 2024-25 या वर्षासाठीचा ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ हिंगणा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भास्कर डोसे सर यांना जाहीर झाला असून, ही बाब संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाची आणि अभिमानास्पद आहे.

डोसे सर गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणे या त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.

शाळेमध्ये स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, डिजिटल साधनांचा वापर करून त्यांनी शिक्षण अधिक प्रभावी आणि आकर्षक बनवले आहे. विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने संवाद साधण्याची त्यांची शैली आणि मार्गदर्शक भूमिका यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळले आहे.

शैक्षणिक कार्यासोबतच डोसे सर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तसेच सध्या संचालक म्हणूनही कार्यरत असून, शिक्षक सहकारी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

त्यांच्या शिक्षणप्रेमी, तंत्रस्नेही व प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, डोसे सर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (युवा क्रांती वृतसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment