---Advertisement---

शेगाव उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाची धडक, ५८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

शेगाव उड्डाण पुलावर अपघातस्थळ
---Advertisement---

शेगाव (डी ललित) :आज सकाळी सुमारे ६.३० ते ७.०० वाजताच्या दरम्यान शेगाव येथील उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. या अपघातात ५८ वर्षीय महिला जागीच दगावली, तर अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन घटनास्थळावरून फरार झाले आहे.

मृत महिलेचे नाव ताईबाई सुरेश कळसकार (वय ५८) असून त्या रा. बाळापूर, ता. बाळापूर येथील रहिवासी होत्या. त्या खलवाडी येथील आपल्या मुलीस भेटून सकाळी खलवाडीहून पायी बाळापूरकडे जाण्यासाठी बस स्थानकाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

उड्डाण पुलावर मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ताईबाई कळसकार यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या व जागीच गतप्राण झाल्या. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेबाबत मृत महिलेचे जावई श्रीकृष्ण आत्माराम वानखेडे यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात वाहनचालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास गट्टे हे करीत आहेत.

या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, उड्डाण पुलावरील वाहतूक सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (युवा क्रांती वृतसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment