---Advertisement---

बिहारमध्ये एनडीएला बहुमत; अमरावतीत भाजपचा विजय उत्सव!

---Advertisement---

अमरावती(युवा क्रांती वृत्तसेवा): बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर राज्यभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या विजयाचा जल्लोष अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांसोबत साजरा करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले की, “बिहारमधील जनतेने दिलेला हा प्रचंड विश्वास विकास, सुशासन आणि स्थिरतेवरील त्यांच्या ठाम श्रद्धेचा पुरावा आहे. एनडीए सरकारच्या कामावरचा विश्वास पुन्हा एकदा जनतेने दाखवून दिल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

आमदार कुटे यांनी बिहारच्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, हा विजय देशाच्या प्रगतीचा मार्ग अधिक वेगाने पुढे नेणारा ठरेल. अमरावतीतील भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत आणि घोषणांनी विजयाचा आनंद साजरा केला.

एनडीएच्या या दणदणीत विजयामुळे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाचा संचार झाला असून आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment