---Advertisement---

सिन्नरमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी उद्धवसेनेला मोठा धक्का!!

---Advertisement---

भाजपचा मोठा डाव! माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे आज भाजपात

सिन्नर (युवा क्रांती वृत्तसेवा) : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात भाजपमध्ये इन्कमिंग वाढताना दिसत आहे. त्यात आज सिन्नरच्या राजकारणात आणखी एक मोठी घटना घडणार आहे.

सिन्नरचे माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे आज शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असून, वाजे यांच्या प्रवेशामुळे सिन्नरमधील भाजपची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

हेमंत वाजे हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलत काका असून, त्यांच्या भाजप प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. वाजे हे पूर्वी नगराध्यक्ष आणि गटनेते म्हणून कार्यरत राहिले असून, आगामी निवडणुकीत ते नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार ठरू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

अलीकडेच माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल आणि भारत कोकाटे यांनीही भाजपात प्रवेश केल्याने नाशिक जिल्ह्यात भाजपचा राजकीय प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment