शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभाग उमेदवारीच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षातर्फे आज भव्य शक्तिप्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे नेतृत्व माननीय आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली होणार असून पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रॅलीत भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा मोर्चा तसेच विविध आघाड्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रभागातील सर्व उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनीही रॅलीत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
ही भव्य शक्तिप्रदर्शन रॅली माहेश्वरी भवन येथून भव्य दिमाखात सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवारांना प्रचंड जनसमर्थन मिळावे यासाठी ही रॅली महत्त्वाची मानली जात आहे.












