---Advertisement---

नायलॉन मांज्याने गळा कापला; ४० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

वडगाव वान परिसरात नायलॉन मांज्यामुळे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची घटना
---Advertisement---

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : पळशी पुरा, संग्रामपूर येथील रहिवासी शेख अनीस शेख गफ्फार (वय ४०) हे वडगाव वान परिसरात नायलॉन मांज्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता घडली. या घटनेमुळे नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख अनीस हे दानापूर येथे क्रिकेट खेळण्यासाठी जात असताना वडगाव वान परिसरात अचानक रस्त्यावर लोंबकळणाऱ्या नायलॉन मांज्याने त्यांच्या गळ्याला खोल चिरा बसला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना वरवट बकाल येथील रुग्णालयात दाखल केले.

मात्र जखम गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नायलॉन मांज्याचा वापर किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

नागरिकांना आवाहन :

दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना नायलॉन मांज्याचा वापर टाळण्याचे तसेच अशा धोकादायक मांज्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment