जळगाव जामोद (आकाश बोडसे): भारतीय कपास निगम (CCI), अकोला यांच्या मार्फत जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शहरातील श्री सुपो जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी, नांदुरा रोड, जळगाव जामोद येथे कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ सोमवार, दि. 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजित पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सीसीआयचे केंद्रप्रमुख अविनाश गावंडे व श्री सुपो जिनिंग अँड प्रेसिंगचे संस्थापक डॉ. किशोर केला प्रमुख उपस्थित होते.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी सुपो जिनिंगचे संचालक किसानलालजी केला, सीसीआयचे सहाय्यक अनंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत अवसरमोल यांच्यासह संचालक मंडळातील
दत्ता पाटील, महादेव भालतडक, मनोज राठी, प्रभात पाटील, रंगराव देशमुख, गोपाल टावरी, पुरुषोत्तम राठी, अशोक तेल्हारकर उपस्थित होते.
तसेच सुपो जिनिंगचे शरद सुरपाटणे, अजय माचणकर, देवसिंग मसाने, महादेव बोंबटकार, बाजार समितीचे कर्मचारी प्रमोद पुदाखे, महादेव बाठे, मच्छिंद्र मुळे, संजय घाटे, हिस्सल यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आवाहन
यावेळी बोलताना सभापती प्रसेनजित पाटील यांनी जळगाव जामोद तालुका व परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआय मार्फत सुरू करण्यात आलेल्या श्री सुपो जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या अधिकृत खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन केले.
सीसीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दर, पारदर्शक व्यवहार व वेळेत पैसे मिळणार असल्याने या केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.













