---Advertisement---

चांगेफळ येथे अवैध रेती वाहतुकीवर महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त

अवेध रेती वाहतुकीवर कारवाई
---Advertisement---

चांगेफळ (आकाश बोरसे) : चांगेफळ परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कडक कारवाई करत एक टिप्पर जप्त केला असून सदर वाहन तामगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला टिप्पर संदीप गावंडे यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई दि. 03 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता करण्यात आली. नायब तहसीलदार विकास शिंदे, नायब तहसीलदार राहुल वसावे तसेच ग्राम महसूल अधिकारी संतोष खारोळे यांच्या पथकाने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली.

दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर दि. 02 जानेवारी 2026 रोजी रात्री देऊळगाव फाट्याजवळ अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना ग्राम महसूल अधिकारी संतोष खारोळे यांना दमदाटी व मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी करण गाडे याच्याविरुद्ध तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलग दोन दिवसांत महसूल पथकाने दोन कठोर कारवाया केल्यामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. महसूल प्रशासनाने पुढेही अशाच कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

(युवा क्रांती न्यूज)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment