---Advertisement---

दहीहंडीच्या थरारात रंगणार शेगांव शहर; हर्षूताई ठाकूर यांचे विशेष व्याख्यान

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृतसेवा) – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शेगाव शहरातील दसरा नगर येथे आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडणार असून, त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेरणादायी व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात प्रमुख व्याख्यान सुप्रसिद्ध वक्त्या हर्षूताई ठाकूर यांचे होणार आहे. सामाजिक कार्यामध्ये युवापिढीच्या सहभागावर त्या आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या प्रभावी वाणीने उपस्थित श्रोत्यांना निश्चितच मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे.

महिलांसाठी खास व्यवस्था

कार्यक्रमाचे आयोजन बजरंग दल गणेश नगर व दसरा नगर शाखा, शेगाव यांच्यावतीने करण्यात आले असून, महिलांसाठी खास बसण्याची स्वतंत्र व सोयीस्कर व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे महिला वर्गाने आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हर्षूताई ठाकूर यांचे व्याख्यान संपल्यानंतर रोमांचक दहीहंडीचा कार्यक्रम रंगणार असून, गोविंदा पथकांच्या उपस्थितीत थरारक क्षणांची उपस्थित प्रेक्षकांना अनुभूती मिळणार आहे.

युवा क्रांती न्यूज मार्फत थेट प्रक्षेपण (Live) करण्यात येणार आहे

या संपूर्ण कार्यक्रमाचे युवा क्रांती न्यूज मार्फत थेट प्रक्षेपण (Live) करण्यात येणार आहे. त्यामुळे जे नागरिक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांनी युवा क्रांती न्यूजच्या लाईव्ह प्रसारणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दहीहंडीचा थरार, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, तसेच प्रेरणादायी व्याख्यान – या त्रिवेणी संगमामुळे आजचा संपूर्ण दिवस शेगावकरांसाठी विशेष ठरणार आहे. सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असेही आयोजकांचे आवाहन आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment