(युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे नेते असलेले अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या दुःखद घटनेमुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, आपल्या निकटवर्तीय मित्राला श्रद्धांजली अर्पण करत आणि शोकभावना व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी नियोजित असलेल्या आपल्या सर्व २२ जाहीर सभा मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात अजित पवार यांच्या निधनामुळे शोककळा पसरलेली असताना कोणतेही राजकीय प्रचारकार्य न करता दुःखद घटनेचा आदर राखणे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे राजकीय व सामाजिक स्तरावर स्वागत होत असून, अनेक नेत्यांनी हा निर्णय संवेदनशीलतेचा आदर्श असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.










