---Advertisement---

तामगावात दोन देशी पिस्तुलांसह एक जण अटकेत!

---Advertisement---

बुलढाणा (आकाश बोरसे) : जिल्ह्यातील तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहिता काळात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एकूण ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून या धडाकेबाज कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

वरवट बकाल परिसरात संशयास्पद हालचालींची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पवन वासुदेव कोकाटे (वय ३४, रा. नांदेड) यास ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांनी केले. पथकात हेकॉ. एजाज खान, पोकॉ. अमोल शेजोळे, पोकॉ. अजीस परसुवाले आणि डीपीसी शिवानंद हेलगे यांचा समावेश होता.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म्स अॅक्ट कलम ३, २५ सह भा.दं.सं. कलम १२३ आणि १३५ म.पो.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामगाव परिसरात बेकायदेशीर शस्त्रसाठ्याबाबत पोलिसांचा सतर्कतेचा संदेश या कारवाईतून स्पष्ट झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(युवा क्रांती वृतसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment