---Advertisement---

देशी बनावटीच्या ५ पिस्तुलांसह दोन युवकांना अटक; ७ लाखांचा माल हस्तगत

---Advertisement---

बुलढाणा (आकाश बोरसे) : गुप्त माहितीच्या आधारे सोनाळा पोलिसांनी शनिवार दि. २७ ऑक्टोबर टुनकी–सोनाळा रोडवर केलेल्या कारवाईत ५ देशी बनावटीच्या पिस्तुलांसह दोन संशयित युवकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन मॅग्झिन, १६ जिवंत काडतुसे, एक कार, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

सविस्तर माहितीनुसार, काही इसम टुनकी ते सोनाळा मार्गावर अवैधरित्या देशी पिस्तुलांची वाहतूक करणार आहेत. या माहितीवरून पोलिसांनी हनुमान मंदिराजवळ सापळा रचला. काही वेळात टुनकीकडून येणारी पांढरी स्विफ्ट डिझायर क्र. एमपी-२० सीजी-१६९७ गाडी अडवून तपासणी केली असता वाहनातून ५ देशी बनावटीच्या स्टील पिस्तुल किंमत २ लाख रुपये, २ स्टील मॅग्झिन किंमत ६ हजार, १६ जिवंत काडतुसे किंमत १६ हजार, स्विफ्ट डिझायर कार किंमत ५ लाख, २ मोबाईल किंमत १० हजार रुपये आणि रोख १ हजार ६०० रुपये असा एकूण ७ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अटक केलेले आरोपी म्हणजे मोहम्मद नफिज अकिल अली (२४) आणि मोहम्मद उबेद रझा मोहम्मद अल्फाज (२१), दोघेही रा. चांदामेठा, ता. परासिया, जि. छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. या प्रकरणातील शस्त्र पुरवठादार आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सदर प्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात गु.र.क्र. २७०/२०२५ असा गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७, २५ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सपोनि चंद्रकांत पाटील, पोहेकॉ विशाल गवई, पोहेकॉ रमेश खरात, पो.कॉ. राहुल पवार, पो.कॉ. शेख इमराण, पो.कॉ. गणेश मोरखडे, पो.कॉ. राजू गव्हाणे, पो.कॉ. संजय सास्ते आणि पो.कॉ. गणेश राठोड यांच्या मदतीने करण्यात आली.

(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment