---Advertisement---

दुबईला प्रथमच कातरगांव-पिंपरी येथून केळी एक्सपोर्ट !

---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील कातरगाव-पिंपरी येथून प्रथमच केळी दुबईला एक्सपोर्ट करण्यात आली आहे. गावातील शेतकरी शिवशंकर प्रभाकर बावस्कार व त्यांचे बंधू गोपाल बावस्कार यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे फळ अखेर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचले आहे.

या बंधूंनी आपल्या शेतातून दर्जेदार व एक नंबर दर्जाची केळी उत्पादन केली. मात्र, सध्या बाजारात केळीला कवडीमोल दर मिळत असल्याने ते दोघेही चिंताग्रस्त होते. वर्षभर कष्ट करूनही योग्य भाव मिळणार नाही या कारणामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. याच दरम्यान काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या शेतातील केळीची पाहणी करून “तुमची केळी एक्सपोर्ट होईल” असे सांगितले. तत्काळ पॅकिंग करून त्यांची केळी दुबईला पाठविण्यात आली.

यशाबद्दल समाधान असले तरी शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणीही शेतकरी बांधवांकडून करण्यात आली आहे.

गावातून प्रथमच केळी एक्सपोर्ट झाल्याबद्दल शिवशंकर बावस्कार व गोपाल बावस्कार या दोन्ही बंधूंचे ग्रामस्थांकडून हार्दिक अभिनंदन होत आहे. (युवा क्रांती वृतसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment