बुलडाणा (सचिन कडूकार) : स्थानिक एफ. एम. काशेलानी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
१९ वर्षाखालील वयोगटातील या स्पर्धेत प्रीत दीपक चंडाले, अर्पित अजय चंडाले, शिवराज सोपान टाले, हर्ष विजय पोंदे व यश पुरुषोत्तम मानतकार यांनी उल्लेखनीय कामगिरी करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. विजेत्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे शाळेचा प्रीत चंडाले हा उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडला गेला असून बुलडाणा जिल्हा क्रीडा मार्गदर्शक मा. जीवन मोहोड सरांच्या हस्ते त्याला अतिरिक्त सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळेचे अध्यक्ष मनोज काशेलानी, संचालक कुणाल काशेलानी, सहसंचालक शुभम देशमुख, सल्लागार संचालिका भूमिका काशेलानी व मुख्याध्यापिका योगिता गावंडे यांनी क्रीडा शिक्षक प्रेम सावळे व सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. (युवा क्रांती वृतसेवा)










