एफ. एम. काशेलानी शाळेच्या टेबल टेनीस चमूचा विभागावर भव्य विजय !
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : एफ. एम. काशेलानी शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक गौरवशाली यश मिळाले आहे. शाळेच्या १९ वयोगटाखालील टेबल टेनीस चमूने क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय यवतमाळ, जिल्हा क्रीडापरिषद यवतमाळ, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय टेबल टेनीस स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय विजयामुळे शाळेच्या चमूने राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अफाट मेहनत, चिकाटी आणि संघभावना दाखवून प्रीत दीपक चंडाले, अर्पित अजय चंडाले, शिवराज सोपान टाले, हर्ष विजय पोंदे, यश पुरुषोत्तम मानतकार यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या यशामध्ये विद्यार्थ्यांमागे शाळेचे संचालक श्री कुणाल काशेलानी सर यांची विशेष मेहनत असून क्रीडा शिक्षक प्रेम सावळे सर यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे परिश्रम निर्णायक ठरले.
तसेच या यशामध्ये संजय चोपडा (पारिजा स्पोर्ट क्लब, खामगांव) सरांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी सुरुवातीपासून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये टेबल टेनिसबद्दल रुची निर्माण करत वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
शाळेचे संचालक श्री कुणाल काशेलानी सर, सहसंचालक शुभम देशमुख सर, सल्लागार संचालिका भूमिका काशेलानी मॅम, मुख्याध्यापिका योगिता गावंडे मॅडम यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून राज्यस्तरावरही चमू अशीच उज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एफ. एम. काशेलानी शाळा नेहमीच सर्वांगीण विकासावर भर देत आली आहे आणि हा विजय त्या परंपरेला साजेसा आहे.








