बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हे शाखा पथकाने एटीएम कटिंगसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या फरार आरोपीला जेरबंद करून मोठे यश मिळविले आहे. तामगांव पोलिस स्टेशनच्या अप.क्र. 05/2024 मधील गंभीर कलमांसह सन 2014 पासून सुरू असलेल्या एटीएम कटिंग प्रकरणात आरोपी सतत फरार होता.

फरार आरोपी जेरबंद
तामगांव पोलिसांच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला साजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान (वय 34, रा. जालना) याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक सक्रिय होते. गुप्त पाळत आणि सातत्यपूर्ण तपासानंतर अखेर 10 डिसेंबर 2025 रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीवर भादंवी कलम 395, 380, 427, 34 प्रमाणे दाखल गुन्हा असून 2014 पासूनच्या एटीएम कटिंग प्रकरणातही तो मुख्य संशयित होता. वैद्यकीय तपासणी करून आरोपीला पुढील कारवाईसाठी तामगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाईचे मार्गदर्शक अधिकारी व पथक
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा/खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
- पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे
- हेडकॉन्स्टेबल एजाज खान
- पोलिस नाईक अमोल शेजोल
- पोलिस नाईक अजीस परसूवाले
- कैलास ठोंबरे
- शिवानंद हेलगे
स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेल्या तत्परतेमुळे परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसणार असल्याचे नागरिकांचे मत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)










