---Advertisement---

एफ. एम. काशेलानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची गायत्री सेवा कुंज गोरक्षण येथे शैक्षणिक भेट

---Advertisement---

शेगांव (सचिन कडूकार) : एफ. एम. काशेलानी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच जवळा येथील गायत्री सेवा कुंज गोरक्षण केंद्राला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील गायींचे महत्त्व आणि गोरक्षणाची संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा होता.

विद्यार्थ्यांना गोरक्षण केंद्रातील गायी, बैल आणि वासरांची निगा, त्यांचे अन्न, निवारा, स्वच्छता यासंबंधी सखोल माहिती देण्यात आली. आजारी जनावरांवरील उपचारांचीही प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली.विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या भेटीने त्यांच्यात संवेदनशीलता, करुणा व जबाबदारीची भावना निर्माण झाली, असे मत शाळेचे संचालक कुणाल काशेलानी सर, सहसंचालक शुभम देशमुख सर आणि सल्लागार संचालिका भूमिका काशेलानी मॅडम यांनी व्यक्त केले.

मुख्याध्यापिका योगिता गावंडे मॅडम म्हणाल्या, “ही शैक्षणिक भेट म्हणजे पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन जीवनमूल्यांची जाणीव देणारा अनुभव होता. गोसेवा, निसर्ग आणि समाज यांच्याशी नातं जोडणाऱ्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो.”

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गायत्री सेवा कुंज गोरक्षणचे कार्यवाहक नितीन भाऊ अवस्थी, तसेच क्रीडाशिक्षक प्रेम सावळे सर, अजय काटोले सर, जुई सकळकडे मॅडम, प्रणिता अवस्थी मॅडम, आशा गीते मॅडम, तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (युवा क्रांती वृतसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment